Man bites off wife nose Crime News : कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे नाक दातांनी तोडून काढल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्ज फेडण्याच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ३० वर्षीय विद्या नावाच्या माहिलेला या घटनेत जखम झाली आहे. शिवमोग्गा शहरातील एका खाजगी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत. विद्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जयनगर पोलीस ठाण्यात एक मेडिको लीगल केस (एमएलसी) दाखल करण्यात आली आहे. नंतर हे प्रकरण दावनगेरे येथील चन्नागिरी पोलीस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ जुलै रोजी दुपारी घडली. दोघेही दावणगेरे येथील चन्नगिरी तालुक्यातील मंतरघट्टा गावातील रहिवासी आहेत. जेव्हा विद्या आणि विजय हे कर्जाचे पैसे परत करण्याबाबत भांडत होते तेव्हा ही घटना घडली असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की रागात विजयने विद्याच्या नाकाचा चावा घेतला आणि त्याचा लचका तोडला. यामुळे नाकाचा एक भाग तुटून वेगळा झाला.

परिसरात खळबळ

या दोघांचा आवाज ऐकून जवळचे लोक मदतील धावले आणि त्यांनी विद्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरु केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पती स्वतःच्या पत्नीबरोबर असं करू शकतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अशीच एक घटना मे महिन्यात उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे देखील घडली होती, येथे एका व्यक्तीने कार पार्किंगवरून झालेल्या वादानंतर रेसिडेंशियल सोसायची सेक्रिटरीच्या नाकाचा चावा घेतला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.