उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. योगींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याने किलापूर येथील उपदेश यादव समाजवादीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, उपदेश फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपदेश यादव याने गुरुवारी रात्री मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी सकाळी भाजपचे नेते मनोज कश्यप यांनी उपदेशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कश्यप यांनी जलालाबाद विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. कश्यप यांच्या तक्रारीनंतर उपदेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मिर्झापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी विरेंद्र चौहान यांनी दिली. दरम्यान, उपदेश फरार असून त्याचा शोध सुरू आहे, असेही चौहान यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man booked for making derogatory comments against yogi adityanath on social media
First published on: 19-08-2017 at 18:30 IST