कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका यावर्षी पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( १२ जानेवारी ) कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेची मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी रोड शो करत असताना एका तरुणाने जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण, तेवढ्यात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ( एसपीजी ) च्या सुरक्षारक्षकाने तत्काळ त्या तरुणाला तेथून बाजूला केलं आहे.

कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करत होते. तेव्हा एक तरुण रस्त्याच्या कडेला हार घेऊन उभा होता. पंतप्रधान मोदी कारच्या दरवाज्यात उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. तेवढ्यात सुरक्षा भेदून तरुणाने पंतप्रधानांना हार घालण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षा रक्षकांनी तातडीने तरुणाला बाजूला केलं. मात्र, तरुणाने दिलेला हार पंतप्रधान मोदींनी घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस, भाजपा आणि जेडीएसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर, भाजपा आपली सत्ता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी दौरा केला होता. त्यानंतर आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत.