एक तरुण त्याच्या बाईकवरून घसरला आणि थेट धावत्या ट्रकच्या खाली जाऊन पडला. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ ही म्हण या तरुणाच्या बाबतीत खरी ठरली आहे. कारण अपघात होऊनही या तरूणाचा जीव वाचला.  उत्तराखंडच्या पितोगड जिल्ह्यात ही घटना घडली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने यासंदर्भातला व्हिडिओ ट्विट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघाताची ही घटना नेमकी कोणत्या तारखेला घडली ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र हा व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. एक तरुण त्याच्या बाईकवर बसून येतो अचानक त्याची बाईक घसरते आणि थेट ट्रकखाली जाऊन पडतो. अवघ्या काही सेकंदांची ही दृश्यं थरकाप उडवणारी आहेत. या तरूणाचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आणि हा अपघात होताच बघ्यांची गर्दी जमली.

पाहा व्हिडिओ

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man falls in front of moving truck in uttarakhand survives
First published on: 18-11-2017 at 18:29 IST