दिल्ली जवळील ग्रेटर नोएडाच्या एका हाउसिंग सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीत राहणाऱ्या महिलांचे चोरून चित्रीकरण करणाऱ्या एका व्यक्तीला रहिवाशांनी पकडण्यात आले आहे. महिला आंघोळीसाठी गेल्यानंतर हा तरुण पाईपच्या सहाय्याने चढून जायचा आणि त्यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण करायचा. गेले अनेक दिवस हा प्रकार घडत होता. अखेर २० दिवसानंतर आरोपीला पकडण्यात यश आले.

सोसायटीतील रहिवाश्यांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल
नोएडातील अजनारा ले गार्डन हाऊसिंग सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीच्या या हरकती सोसायटीच्या सीसीटिव्हीत कैद झाल्या आहेत. त्यानंतर सोसायटीतील रहिवाश्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपीला पकडण्यात यश मिळत नव्हते. अखेर रहिवाश्यांनीच आरोपीची शोध मोहीम सुरु केली. एक दिवस सोसायटीच्या रहिवाशाने आरोपीला बाजारात फिरताना पाहिले आणि आरोपीला पकडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अगोदर या सोसायटीमध्ये दोन हत्याही झाल्या आहेत.
सोसायटीमध्ये योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटत नसल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या अगोदर या सोसायटीमध्ये दोन हत्याही झाल्या आहेत. सुरक्षा रक्षकांच्या दुर्लक्षपणामुळेच असे प्रकार घडत असल्याचा अरोप रहिवाश्यांनी केला आहे.