खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. या यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून सामाजिक, आर्थिक, कला तसेच अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती या यात्रेत सहभाग नोंदवत आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी काँग्रेसने केली होती. असे असतानाच आता पंजबामधील होसिनापूर येथे राहुल गांधी यांची सुरक्षा भेदून एक तरुण त्यांची गळाभेट घेण्यास आल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा >>> ललित मोदींनी मागितली मुकुल रोहतगींची जाहीर माफी, आईचा उल्लेख करत म्हणाले; “रागाच्या भरात…”

सुरक्षा भेदून तरुण राहुल गांधींजवळ आला

भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमधील होसिनापूर येथे आहे. यात्रेमध्ये राहुल गांधी चालत होते. मात्र यावेळी एक तरुण त्यांच्याकडे धावत आला. तसेच सुरक्षा भेदून हा तरुण राहुल गांधी यांची गळाभेट घेण्याचा प्रयत्न करत होता. तरुण आपल्याकडे येत असल्याचे समजताच राहुल गांधी यांनी त्याला बाजूला केले. त्यानंतर सुरक्षा रक्षक तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला दूर केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रसंगानंतर राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा >>> Video : ती कुत्र्यांना खायला देत होती अन्..; चंदीगढमधील अपघाताचं थरकाप उडवणारं CCTV फूटेज आलं समोर; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप

अमित शाहांना लिहिले होते पत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत दिल्ली पोलिसांकडून हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. तसेच भारत जोडो यात्रेतील गर्दी बघता राहुल गांधी यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ पावलं उचलावीत, अशी मागणीही त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली होती.