उत्तर प्रदेशात चपाती बनवताना पीठावर थुंकणाऱ्या व्यक्तीला अटक, गाझियाबाद पोलिसांची कारवाई

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनेच्या लोकांनी तक्रार दाखल केली आहे.

Man Spitting While Making Rotis Arrested Ghaziabad police
(फोटो सौजन्य- ANI)

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या लोणी भागात चपाती बनवताना एक व्यक्ती पीठावर थुंकताना दिसत असलेल्या एका व्हायरल व्हिडिओची उत्तर प्रदेश पोलिसांनी दखल घेतली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनेच्या लोकांनी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर लोकांचा संताप अनावर झाला असून त्याच्या अटकेची मागणी होत आहे. त्यानंतर गाझियाबाद पोलिसांनीही व्हायरल व्हिडीओवरुन शोध घेत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी स्वतः व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आणि आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले. लोणीचे पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हिडिओ खरा असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

याआधीही उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका लग्न समारंभात रोटी बनवताना पिठावर थुंकताना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली. नौशाद असे आरोपीचे नाव होते. हिंदू जागरण मंच मेरठचे प्रमुख सचिन सिरोही यांच्या पोलिस तक्रारीत नौशादवर करोना विषाणू पसरवल्याचा आरोप होता. हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यातील आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man spitting while making rotis arrested ghaziabad police abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या