पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत र्पीकर यांचा गौप्यस्फोट

सप्टेंबर २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यांचे नियोजन जून २०१५ पासून सुरू करण्यात आले होते असा गौप्यस्फोट माजी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी केला आहे. त्यामुळे उरी येथे पाकिस्तानी दहशतावाद्यांनी केलेल्या भारतीय लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी प्रत्युत्तरादाखल हे हल्ले ऐनवेळची प्रतिक्रिया म्हणून करण्यात आल्याच्या तत्कालीन चर्चेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

मणिपूरमध्ये लष्कराच्या वाहन काफिल्यावर एनएससीएन के गटाने हल्ला केल्यानंतर म्यानमार सीमेवर पहिला लक्ष्यभेद हल्ला केला होता तो यशस्वी झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील  या हल्ल्याचे नियोजन सुरू केले होते असे र्पीकर यांनी म्हटले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या लक्ष्यभेद हल्ल्याचा घटनाक्रम विषद करताना त्यांनी काल येथे उद्योजकांच्या मेळाव्यात सांगितले की, ४ जून २०१५ रोजी मणिपूरमध्ये १८ जवान मारले गेल्याच्या घटनेने अपमानित झाल्यासारखे वाटले होते. त्याला लगेच प्रतिक्रिया म्हणू म्यानमार सीमेवर लक्ष्यभेद हल्ला केला गेला. नंतर लगेचच पश्चिम सीमेवर अशाच हल्ल्याचे नियोजन सुरू केले होते. त्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ रोजी पश्चिम सीमेवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेद हल्ले करण्यात आले पण त्याचे नियोजन ९ जून २०१५ पासून केले होते म्हणजे १५ महिने अगोदर हल्ले करण्याची योजना आखली गेली होती त्यासाठी अतिरिक्त जवानांना प्रशिक्षण दिले होते व काही सामुग्रीही खरेदी करण्यात आली होती.

२०१६ मध्ये जे लक्ष्यभेद हल्ले करण्यात आले त्यात डीआरडीओने तयार केलेले स्वाथी वेपन लोकेटिंग रडार प्रथम वापरण्यात आले. त्याच्या मदतीने पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबार छावण्या शोधण्यात आल्या. अधिकृत पातळीवर ही यंत्रणा तीन महिने नंतर लष्करात दाखल झाल्याचे दाखवण्यात आले होते. या यंत्रणेमुळे पाकिस्तानी लष्कराच्या व दहशतवाद्यांच्या गोळीबार करणाऱ्या ४० छावण्या शोधण्यात यश आले होते. मणिपूर येथे जवान मारले गेल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील लक्ष्यभेद हल्ल्याचे नियोजन १५ महिने आधीच करण्यात आले होते.

मणिपूरमध्ये २०० जणांच्या एका किरकोळ दहशतवादी संघटनेने हल्ल्यात १८ डोगरा जवानांचा बळी घेतला होता व त्यावेळी आम्ही दुपारी व सायंकाळी एकत्र बसून हल्ल्याची योजना आखली व ८ जूनला भारत म्यानमार सीमेवर लक्ष्यभेद हल्ले करून ७०-८० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तो हल्ला कमालीचा यशस्वी झाला. त्यात केवळ एक भारतीय जवान जखमी झाला, या  हल्ल्यात हेलिकॉप्टर्स वापरले नव्हते पण ते तयार ठेवण्यात आले होते हे खरे आहे.

पर्रिकर यांच्या वक्तव्यावर ओमर यांची टीका

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सची तयारी १५ महिन्यांपूर्वी केली होती या माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या वक्तव्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टीका केली आहे. यावर ओमर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले विचार मांडले. हल्ल्यांचा उरी येथील दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाही. एका टेलिव्हिजन अँकरने विचारलेल्या अपमानास्पद प्रश्नामुळे हल्ले करण्यात आले. ही अजब गोष्ट आहे. यावर काय बोलावे? अशा शब्दांत ओमर यांनी पर्रिकर यांच्या वक्यतव्यावर टीका केली आहे. असा पद्धतीने एखाद्या पत्रकाराच्या प्रश्नामुळे हल्ले केले जाणार असतील तर त्यातून पाकिस्तानशी मोठे युद्धही उद्भवू शकले असते. असा निर्णयप्रक्रियेमुळे नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल, असेही ते म्हणाले.