Mans Body found in a drum in Rajasthan Murder Case : राजस्थानच्या अलवर येथे झालेल्या हत्येच्या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान या संपूर्ण प्रकरणाला एका भयानक नवीन वळण आले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचा आठ वर्षांचा मुलगा या प्रकरणात प्रमुख साक्षीदार म्हणून समोर आला आहे. पाणी साठवण्यासाठी वापरला जाणारा निळा ड्रम त्याच्या आईने आणि तिच्या कथित प्रियकराने त्याच्या वडिलांचा मृतदेह लपवण्यासाठी वापरल्याची माहिती या मुलाने दिल्याचे पोलिसांन स्पष्ट केले. पीडित हंसराज याच्या थोरल्या मुलाने वडिलांची हत्या झाली त्या दिवशी त्यांच्या किशनगड येथील घरात हत्येच्या आधी आणि नंतर नेमकं काय घडलं याबद्दल माहिती दिली आहे.
मुलाने सांगितला घटनाक्रम
“माझे वडील, आई आणि काका (त्यांच्या घरमालकाचा मुलगा) एकत्र बसून दारू पित होते. माझी आईने मोजकेच पेग घेतले होते, पण ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्या काकांनी खूप दारू घेतली होती. आणि माझे वडीलही खूप दारू पित होते, त्यांनंतर त्यांनी माझ्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. काकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण माझे वडील म्हणाले, जर तू तिला वाचवलेस तर मी तुझाही जीव घेईन,” असे त्या मुलाने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.
“त्यानंतर काकांनी माझ्या वडिलांवर हल्ला केला,” असेही तो म्हणाला. त्यानंतर त्याच्या आईने त्याला झोपायला जाण्यास सांगितलं असं पुढे त्यांने स्पष्ट केलं.
मुलाने सांगितले की त्याने वडीलांना बेडर पाहिले आणि नंतर त्याची आई आणि काका हे घरमालकाला घाबरून कुटुंबाला घेऊन वीटभट्टीवर गेले.
“जेव्हा मी जागा झालो, तेव्हा मी माझ्या वडिलांना बेडवर पाहिले, त्यानंतर मी परत झोपी गेलो, पण पुन्हा जेव्हा मी जागा झालो तेव्हा मी काका आणि माझ्या आईला पाहिले. ते घाबरले होते कारण घरमालक त्यांना माझ्या वडिलांबद्दल विचारत होता आणि पोलिसांत जाण्याची धमकी देत होता, त्यामुळे काका आम्हाला घेऊन वीटभट्टीकडे गेले,” असे त्याने सांगितले.
“पण वीटभट्टीच्या मालकाने पोलिसांना फोन केला, जे आम्हाला घेऊन गेले,” असे त्याने सांगितले.
वडिलांचा मृतदेह किचनमध्ये असलेल्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता आणि आरोपीने त्याला मृत्यू झाल्याचे सांगितले होते असेही त्या मुलाने सांगितले. पोलिसांनी स्पष्ट केले की हंसराज याची दारूच्या नशेत असताना उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली होती.
“त्यांनी पाणी टाकले आणि वडिलांचा मृतदेह ड्रममध्ये टाकला आणि स्वयंपाकघरात ठेवला. मी त्यांना ते असे का करत आहेत याबद्दल विचारले,यावर त्यांनी सांगितले की त्यांचा मृत्यू झाला आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
मुलाने असेही सांगितले की त्याचे वडील त्याच्या आईला नेहमी मारहाण करत आणि इतकेच नाही तर सिगारेटचे चटके देखील देत. त्याने असाही दावा केला की एकदा त्याच्या वडिलांनी ब्लेडने त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला होता.
“ते माझ्या आईला नेहमी मारहाण करत. ते तिला बिडीने चटके देखील देत. ते मलाही मारहाण करत. खरंतर १५ ऑगस्ट रोजी त्यांनी माझ्या गळ्यावर ब्लेडने हल्ला केला,” असे तो म्हणाला.
पोलिसांनी सांगितले की १५ ऑगस्टच्या दिवशी हत्या झाली. घरमालग महिलेला दुर्गंधी आल्यानंतर हंसराज याचा मृतदेह पहिल्या मजल्यावरील भाड्याच्या घरात एका बंद केलेल्या निळ्या ड्रममध्ये आढळून आला.
हंसराजची पत्नी सुनिता आणि जितेंद्र शर्मा यांनी त्याची हत्या केली आणि ड्रममध्ये मृतदेह भरून त्यामध्ये मिठ टाकलं. शर्मासह कुटुंबाला गुन्हा घडला त्या घटनास्थळापासून ५० किमी अंतरावर असलेल्या वीटभट्टीवरून अटक करण्यात आली.
सुनिता आणि शर्मा हे गेल्या ४ महिन्यांपासून नात्यात होते, असे वृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिले आहे. हंसराजला ही गोष्ट माहिती होती आणि यावरून तो सुनिताला भांडत असे. दरम्यान या जोडप्याची मुले ही हंसराज याच्या पालकांकडे सोपवण्यात आली आहेत.