Mansa Devi Haridwar Stampede VIDEO : हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर रविवारी सकाळी ही चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक जण जखमी देखील झाले आहेत. मनसा देवी मंदिर हे हरिद्वारच्या पाच पवित्र स्थळांपैकी एक मानलं जातं. या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आज मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, याचवेळी अचानक चेंगराचेंगरीची घटना घडल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.
गोंधळाचा धक्कादायक व्हिडीओ समोर
या चेंगराचेंगरीच्या घटनेआधी नेमकं काय घडलं? या गोंधळाचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत असं दिसून येत आहे की मनसा देवी मंदिरात जाण्यासाठी बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. ही गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे की भाविकांना एका बाजूवरून दुसऱ्या बाजूलाही जाता येत नसल्याचं दिसून येत आहे.
यातच गोंधळाची परिस्थिती निर्माण होताच व्हायरल व्हिडीओमध्ये काही नागरीक गर्दी कमी करण्यासाठी भाविकांना मागे जा, मागे जा… (पीछे जाओ पीछे) असं ओरडताना दिसत आहेत. मात्र, त्यानंतर काही वेळातच चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरल्याचं पाहायला मिळालं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
हरिद्वार के मनसा देवी मंदिर में दर्शन के दौरान मची भगदड़ में 6 श्रद्धालुओं की दर्दनाक मौत की सूचना है। श्रद्धालुओं की भारी भीड़ के कारण हालात बिगड़े।प्रशासनिक तैयारियाँ हुईं फ्लॉप। #haridwar #mansadevi #Uttarakhand #gangaji pic.twitter.com/BZQnuSQGm1
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) July 27, 2025
नेमकं घटना काय घडली?
हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर रविवारी सकाळी ही चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती गढवाल डिव्हीजनचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिली आहे. “हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मी घटनास्थळाकडे जात आहे. या घटनेच्या सविस्तर अहवालाची प्रतिक्षा आहे,” असे गढवाल डिव्हिजनचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितलं होतं.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चेंगराचेंगरीनंतर सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं. तसेच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असल्याचे म्हटलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलं की, “हरिद्वार येथील मनसा देवी मंदिराच्या मार्गावर चेंगराचेंगरीच्या घटनेची दुःखद बातमी मिळाली आहे. SDRF, स्थानिक पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्छळी पोहचून बचाव कार्य करत आहेत. याबाबतीच मी सतत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. माता राणीचे सर्व भाविक सुखरूप राहावेत यासाठी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.