Assam Flood Marathi News मणिपूरमध्ये सैन्यांवर जवानांवरच अस्मानी संकट ओढवलं आहे. मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या भुस्खलनात सैन्याच एक कॅम्प ढिगाऱ्याखाली दबला गेल्याचे सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत ७ जणांचे मृतदेह काढण्यात आले असून, १९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, आणखी ५५ जवान ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – BYJU’s कंपनीने २५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले; भारतातील शैक्षणिक मार्केट मंदीचा कंपनीला फटका

जखमी जवानांना रुग्णालयात दाखल

गंभीर जखमीं जवानांना उपचारासाठी नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार केला जात होता. . त्याच्या सुरक्षेसाठी टेरिटोरियल आर्मीचे १०७ जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, बुधवारी मुसळधार पावसामुळे जवानांच्या कॅम्पला भुस्खलनाचा फटका बसला आणि जवानांचा कॅम्प उद्ववस्थ झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावासामुळे बचावकार्यात अडथळा
या घटनेची माहिती मिळताच लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू केले. मात्र, पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. ह्रॅलिकॉप्टरद्वारे जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.