भारतीय साम्यवादी(माओवादी)  पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारांदाच्या जंगलात रस्ते बांधणीच्या कामावर असणारी सहा वाहने पेटवून दिली़  सुमारे ३० माओवाद्यांच्या समूहाने रविवारी रात्री अचानक घाला घालून हे कृत्य केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद कुमार सिंग यांनी सांगितल़े केंद्र शासनाच्या सारांदा कृती आराखडय़ानुसार सुरू असलेल्या सार्वजनिक कामावरील वाहने जाळण्यात आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सुरक्षा यंत्रणांनी हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी मोठी शोध मोहीम हाती घेतली आह़े  ही मोहीम पोलीस अधीक्षक पंकज कंबोज यांच्या नेतृत्वाखाली राबवली जात आह़े नक्षलवादी आणि माओवादी आटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यावर प्रयत्न करण्यात येत असले, तरीही त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही़.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maowadi fire road marking vehicle
First published on: 27-11-2012 at 02:04 IST