लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांकडून माझ्या जिवाला धोका आहे. मला सुरक्षा पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारकडून पुरेशी सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही, असा आरोप झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केला.
 सध्या मरांडी झारखंड विकास मोर्चा(प्रजातांत्रिक) या पक्षाचे अध्यक्ष असून, निवडणुकीचा प्रचार करताना नक्षलवाद्यांकडून माझी हत्या केली जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.   नोव्हेंबर २००७मध्ये नक्षलवाद्यांनी मरांडी यांच्या मुलाची हत्या केली होती, याची आठवणही मरांडी यांनी सांगितली. मरांडी यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे.