Woman Sexual Harassment : मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आपण एल अँड टीमधले कर्मचारी आहोत असं भासवून त्या माणसाने तिला बायोलॉजिकल हेल्प मागितली. या प्रकरणी महिलेने चॅट्स पोस्ट केले आहेत.

काय म्हटलं आहे महिलेने?

लार्सन अँड ट्युब्रोचा कर्मचारी असून जीत नावाच्या एका माणसाने महिलेला अश्लील मेसेज पाठवले आहेत. तो म्हणाला मला बायोलॉजिकल हेल्प हवी आहे. त्यानंतर त्याने मला विविध मेसेज केले. ज्यामध्ये सगळ्या गोष्टी अशाच होत्या. जीतने माझा लैंगिक छळ केला असंही तिने सांगितलं. ती पुढे म्हणाली मी त्या कथित एल अँड टी कर्मचाऱ्याचा लिंक्डइनवर रिपोर्ट केला आहे. पण जे काही घडलं ते फारच त्रासदायक आहे. माझ्यासारखी एखादी महिला कंपनी चालवते जिच्या भोवती महिला काम करतात. माझ्यासारख्या महिलेला असा अनुभव कसा काय येतो? हे खरंच धक्कादायक आहे.

नेमकं काय घडलं?

कर्मचारी : हाय, तुला संपर्क साधणं हे आनंददायी आहे. कशी आहेस?
महिला : आज नेहमीचं काम चाललं आहे.
कर्मचारी : I need Biological Help
महिला : तू मला असं मूर्खासारखं काहीही कसं विचारु शकतोस?
कर्मचारी : तुला नेमकं काय म्हणायचं आहे?
महिला : तू मला मागचा मेसेज काय पाठवलास बघ.
कर्मचारी : माणसाच्या शरीराला जशी अन्नाची गरज असते, पाण्याची गरज असते तशीच ही गरज आहे. शारिरीक गरज असणं आणि ती पूर्ण करणं यात चूक काय? शारिरीक भूक भागवली गेली नाही तर माणूस विचित्र वागतो. त्याला टेन्शन येतं, त्रास होतो. असं जीत मला निर्लज्जपणे म्हणाल्याचं या महिलेने म्हटलं आहे. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया काय?

हे स्क्रीनशॉट असलेली पोस्ट व्हायर झाली आहे. लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तू ही पोस्ट लिहिली आहेस ते बरंच झालं या लोकांची मानसिकता कशी असते बघा. तुला आलेला अनुभव धक्कादायक आहे. तू जे काही सहन केलं ते धक्कादायक आहे. एखादा माणूस नुकतीच ओळख झालेल्या महिलेला असे मेसेज कसे काय पाठवतो? असं म्हणत लोकांनी कमेंट केल्या आहेत.

एल अँड टीचं म्हणणं काय?

L&T कंपनीने यानंतर त्यांचं पत्रक काढत आम्ही हा प्रकार मुळीच सहन करणार नाही. जो कर्मचारी आहे त्याची चौकशी सुरु आहे. तो दोषी आढळल्यास आम्ही कठोर कारवाई करु असं आश्वासन या महिलेला दिलं आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे आणि सदर व्यक्तीचीही चौकशी सुरु आहे.