मंगळावर उतरण्यापूर्वीच नष्ट झाल्याची भीती

युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स लँडरचा मंगळावरील भूमीवर उतरण्यापूर्वीच स्फोट झाला असावा, असा अंदाज नासाच्या दुसऱ्या एका यानाने घेतलेल्या छायाचित्रावरून व्यक्त करण्यात आला आहे.

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान

युरोपीय अवकाश संस्थेचे एक्सोमार्स शिपारेली यान १९ ऑक्टोबरला मंगळाच्या वातावरणात शिरले व त्याचे तेथील अवतरण सहा मिनिटांत होणे अपेक्षित होते पण ते तेथे उतरण्यापूर्वीच त्याचा पृथ्वीवरील केंद्रांशी संपर्क तुटला. मार्स लँडरचे मातृयान असलेल्या ट्रेस गॅस ऑर्बिटरने जी माहिती नोंद केली आहे, त्यानुसार शेवटी काय घडले असावे याचा अंदाज बांधता येणे शक्य आहे, असे युरोपीय अवकाश संस्थेने म्हटले आहे. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर नव्या खुणांची नोंद केली असून त्या शिपारेली यानाच्या अवतरणासंबंधात असू शकतात.

मार्स रेकनसान्स ऑर्बिटर यानावरील सीटीएक्स कॅमेऱ्याने मेरिडियानी प्लॅनम येथील अपेक्षित ठिकाणी हे युरोपीय संस्थेचे यान उतरण्यापूर्वी काही प्रतिमा टिपल्या होत्या. यान उतरतानाही तेथे काही खुणा दिसल्या असून त्या मे महिन्यातील छायाचित्रापेक्षा वेगळ्या आहेत, त्यातील काही खुणा स्पष्ट असून त्यांचा संबंध शिपारेली यान उतरवण्यासाठी वापरलेल्या १२ मीटर व्यासाच्या पॅराशूटशी संबंधित आहेत, असा अंदाज आहे.