पीटीआय, नवी दिल्ली
लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत मंगळवारी संध्याकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी रालोआ नेत्यांची बैठक सुरू असून भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सभापती आणि उपपदाच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. सूत्रांनी ही माहिती दिली.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, मनोहर लाल, धर्मेंद्र प्रधान, किरेन रिजिजू, एस जयशंकर, वीरेंद्र कुमार आणि अन्नपूर्णा देवी या बैठकीला उपस्थित होते. जनता दल (युनायटेड) चे राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे काही नेतेही या बैठकीत उपस्थित होते.
हेही वाचा >>>बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी? वाचा नेमकं घडलं काय?
१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी, कनिष्ठ सभागृहातील नवीन सदस्य शपथ घेतील आणि त्यानंतर २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.