रवी दत्ता मिश्रा, सुकल्प शर्मा, एक्सप्रेस वृत्त

नवी दिल्ली : ‘मेघा इंजीनियिरग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.’ (एमईआयएल) या कंपनीने निवडणूक रोखे खरेदी करण्याआधी आधी आणि त्यानंतर लगेचच कंपनीला सरकारी विभाग आणि सरकारी उद्योगांकडून पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील प्रकल्पांची कंत्राटे देण्यात आली. निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांविषयी जाहीर केलेल्या माहितीचे ‘द इंडियन एक्सप्रेस’ने विश्लेषण केल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे.

‘एमईआयएल’ने खरेदी केलेल्या बहुसंख्य रोख्यांच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपला देणगी देण्यात आली. पमीरेड्डी पिची रेड्डी आणि पी. व्ही. कृष्णा रेड्डी यांच्या ‘एमईआयएल’ने ९६६ कोटी रुपये मूल्यांचे निवडणूक रोखे खरेदी केले. ‘फ्युचर गेमिंग’नंतर सर्वाधिक किंमतीचे रोखे खरेदी करणारी ‘एमईआयएल’ ही दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 

हेही वाचा >>> ‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

‘एमईआयएल’ने २०१९ ते २०२३ या दरम्यान निवडणूक रोखे खरेदी केले होते. याच कालावधीत कंपनीला पाच मोठया प्रकल्पांची कंत्राटे मिळाल्याचे ‘द इंडियन एक्सप्रेस’ला आढळले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एमईआयएल’च्या देणग्या ‘एमईआयएल’ने एप्रिल २०१९ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत वेगवेगळया वेळी नियमितपणे ९६६ कोटींचे रोखे घेतले. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ५८४ कोटी भाजपला मिळाले. त्यापाठोपाठ बीआरएसला १९५ कोटी आणि द्रमुकला ८५ कोटींच्या देणग्या या रोख्यांच्या माध्यमातून मिळाल्या. वायएसआर काँग्रेस, तेलुगू देसम पक्ष, काँग्रेस, जनता दल (संयुक्त), जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि जनसेना पक्ष या इतर पक्षांनाही ‘एमईआयएल’ने देणग्या दिल्या.