पीटीआय, डेहराडून : उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशात रविवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्यामुळे काही काळ येथील रहिवाशांत घबराट पसरली होती. अनेक जण आपल्या घराबाहेर पळाले.
या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल होती. सकाळी आठ वाजून ३३ मिनिटांनी हा भूकंप झाला. त्याचे केंद्र टिहरी जिल्ह्यात होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्रातर्फे देण्यात आली. डेहराडून, टिहरी व उत्तराखंडच्या अनेक भागांत हे धक्के जाणवले. आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.