आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि आसाम पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एका दहशतवाद्याचा खात्मा केला. आज (मंगळवारी) सकाळपासून लष्कराचे जवान आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोक्राझारमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराचे जवान आणि आसाम पोलिसांना मिळाली होती. हा दहशतवादी मोठे हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत होते. त्यानंतर जवान आणि पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली. आज सकाळपासून ‘ऑपरेशन’ सुरू झाले होते. अखेर लपून बसलेल्या दहशतवाद्याचा माग काढला आणि त्याचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरून एके ४७ रायफल, शस्त्रास्त्रे आणि ग्रेनेड हस्तगत करण्यात आले आहेत. जवान आणि पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ हाती घेतले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Militant gunned down assam kokrajhar district joint operation army assam police
First published on: 25-07-2017 at 11:07 IST