लष्कराशी चकमकीत अतिरेकी ठार

जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात त्राल येथे लष्कराशी झालेल्या चकमकीत मारला गेला.

जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात त्राल येथे लष्कराशी झालेल्या चकमकीत मारला गेला. यात एक जवान जखमी झाला आहे. या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले व मृत अतिरेक्याचा मृतदेह ताब्यात मिळावा यासाठी स्थानिक लोकांनी निदर्शने केली. निदर्शकांनी दोन पोलीस बंकर पेटवून दिले. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अश्रुधुराचा माराही करण्यात आला.
लष्करी प्रवक्तयाने सांगितले की, अरीपाल खेडय़ात तपासणी चालू असताना ही चकमक झाली. तेथे अतिरेकी लपल्याची माहिती आधीच मिळाली होती, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू  होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Militant killed jawan injured in encounter in pulwama

ताज्या बातम्या