बिहार निवडणुकीच्या महासंग्रामात नेत्यांची एकमेकांवरची चिखलफेक दिवसेंदिवस वाढत असून ‘राजद’चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कन्येने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लालूप्रसाद यांची कन्या डॉ.मिसा भारती हिने मोदींची तुलना थेट गल्लीतल्या गुंडाशी केली आहे. त्यांनी मला पाच चपराक लगावल्या. मग मी त्यांना सहा थप्पड दिल्या. पंतप्रधानांच्या भाषणातील ही विधाने पाहता खरंच हे आपल्या देशाचे पंतप्रधान बोलत आहेत असं वाटतच नाही. असं वाटत की कुणीतरी गल्लीतला गुंड भाषण करत आहे, अशी वादग्रस्त पोस्ट मीसा भारती यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर टाकली आहे.
पंतप्रधानपदाचा गर्व झाल्याने मोदींना सर्व संस्कारांचा आणि मर्यादांचा विसर पडला आहे. एक बाप आपल्या मुलीला सेट करण्याचा प्रयत्न करतो का? ही कोणत्या प्रकारची भाषा आहे?, असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यता आले आहे. मुलीला लक्ष्मीसमान मानले जाते पण काही लोक अशा लक्ष्मीशी विवाह करून नंतर तिला कोणत्याही कारणाशिवाय वाऱयावर सोडून देतात. प्रत्येक मुलीचे स्वत:चे असे वेगळे अस्तित्व आणि स्वातंत्र्य असते पण काही लोक अशा मुलीमागे ‘हेर’ सोडतात, अशी टीका देखील मीसा भारती यांनी केली आहे. पंतप्रधानांनी समस्त महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणी मीसा भारती यांनी केली आहे.
“उन्होंने मुझको पांच थप्पड़ मारा, फिर मैंने उन्हें छह थप्पड़ मारा” – लगता नहीं है कि यह देश के प्रधानमन्त्री का… https://t.co/DwJgZfrBMM
— Dr. Misa Bharti (@MisaBharti) October 27, 2015
