भारतीय वंशाच्या एका तीन वर्षीय मुलाचा स्कॉटलंड येथील त्याच्या निवासस्थानी गूढ मृत्यू झाला. मिकाइल कुलर असे या मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची आई रोझदीप हिला पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे.
मिकाइल कुलर हा मुलगा बेपत्ता झाला होता त्यानंतर त्याच्या शोधासाठी अनेक स्वयंसेवकांनी सागरी, हवाई व इतर मार्गानी प्रयत्न केले. बुधवारी रात्री त्याला त्याच्या आईने झोपवले तेव्हा तो शेवटचा दिसला होता.
स्कॉटलंडचे सहायक पोलीस प्रमुख माल्कम ग्रॅहॅम यांनी सांगितले की, उत्तर एडिंबर्ग येथे एका परगण्यात त्याचा मृतदेह मध्यरात्रीपूर्वी सापडला.
तो मिकाइलचाच मृतदेह आहे याची आम्हाला खात्री वाटते. अनेक ठिकाणी या मुलाच्या ठावठिकाणाबाबत आम्ही चौकशी केली होती त्यानंतर मध्यरात्रीपूर्वी त्याचा मृतदेह सापडला.त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, मिकाइलच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली आहे.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस प्रमुख माल्कम ग्रॅहॅम यांनी मदत पथकाचे व मुलाचा शोध घेण्यात मदत करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळेच हरवलेल्या मुलाचा शोध घेणे शक्य झाले. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
भारतीय वंशाच्या मुलाचा मृतदेह सापडला
भारतीय वंशाच्या एका तीन वर्षीय मुलाचा स्कॉटलंड येथील त्याच्या निवासस्थानी गूढ मृत्यू झाला. मिकाइल कुलर असे या मुलाचे नाव असून त्याचा
First published on: 19-01-2014 at 04:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Missing three year old indian origin boys body found in scotland