लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी (२५ मार्च) सहावी यादी जाहीर केली. यामध्ये राजस्थानधील चार उमेदवारांचा समावेश आहे, तर तामिळनाडूमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील नोबोईचा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत नराह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्नीला लोकसभा तिकीट न दिल्याने राजीनामा

आमदार भरत नराह यांनी त्यांच्या पत्नी राणी नराह यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाले नाही. काँग्रेसने लखीमपूर लोकसभा मतदारसंघासाठी उदय शंकर हजारिका यांना उमेदवारी जाहीर केली. राणी नराह या लखीमपूरमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. मात्र, तरीही राणी नराह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : तृणमूलच्या महुआ मोईत्रांविरुद्ध भाजपाकडून प. बंगालमध्ये राजमाता अमृता रॉय रिंगणात!

भरत नराह सहावेळा आमदार राहिले

आमदार भरत नराह यांच्याकडे आसाम काँग्रेसच्या मीडिया सेलचे अध्यक्षपद होते. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या मीडिया सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. आमदार भरत नराह हे तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. भरत नराह हे त्यांच्या पत्नी राणी नराह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झाले होते.

राणी नारा होत्या प्रबळ दावेदार

आसामच्या लखीमपूर लोकसभेसाठी राणी नराह या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. याआधी त्या या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाल्या होत्या. तसेच त्या एकवेळा राज्यसभेवरही निवडून गेल्या होत्या. याबरोबरच केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bharat narah resigned from congress and assam politics loksabha election 2024 marathi news gkt
First published on: 25-03-2024 at 21:16 IST