नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिक्षक दिनी नवी ‘पंतप्रधान श्री’ (प्राईम मिनिस्टर- स्कूल फॉर रायिझग इंडिया) योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत देशातील १४ हजार ५०० शाळा या आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये आणि क्रीडा सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदी म्हणाले की, या शाळांत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे संपूर्ण प्रतििबब दिसेल. शिक्षक दिनानिमित्त ही घोषणा करताना आपणास अत्यंत आनंद होत आहे, असे मोदी यांनी ट्विटरवर नमूद केले आहे. या शाळांतून शिक्षणाची अत्याधुनिक, कालसुसंगत आणि सर्वागिण पद्धत अवलंबिली जाईल.  शिकविण्याची पद्धत ही मुलांची शोधात्मक आणि ज्ञानोपासनेची वृत्ती जोपासणारी असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणातून शिक्षण क्षेत्राचा कायापालट झाला आहे. या शाळा लाखो विद्यार्थ्यांना लाभदायक ठरतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi announces pm shri scheme for upgrading 14500 schools zws
First published on: 06-09-2022 at 04:12 IST