राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. दुसरीकडे पांचजन्यमधून मोहन भागवत यांच्या भूमिकेची पाठराखण करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे पांचजन्यच्या लेखात?

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिरांबाबत एक वक्तव्य केलं. ज्यानंतर माध्यमांमध्ये वाद पाहण्यास मिळाले, तसंच अनेकांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण केले आणि प्रसिद्धी मिळवली. या प्रकरणावर रोज नव्याने प्रतिक्रिया येत आहे. खिलाडू वृत्तीने आणि व्यापक दृष्टीकोनातून मोहन भागवत यांचं म्हणणं समजून घ्यायला हवं होतं. पण तसं न घडता त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. राजकारणासाठी या सगळ्याचा उपयोग करण्यात आला.

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
b praak and ranveer allahbadiya
“सनातनी धर्माचा प्रचार…”, प्रसिद्ध गायकाने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये जाण्यास दिला नकार; म्हणाला, “घाणेरडे विचार…”
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?

भारताने कायमच ऐक्याचं दर्शन घडवलं आहे

आपला भारत देश हा विविधेत एकता हे बिरुद मिरवणारा देश आहे. मागच्या हजार वर्षांमध्ये भारताने जे ऐक्याचं दर्शन घडवलं आहे आणि आत्मसात केलं आहे तसं उदाहरण जगात नाही. अशा देशात मंदिरांचं महत्त्व हे फक्त धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्यं जपणारंही आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्यातील विवेकाचं दर्शन घडवणारं आहे. त्याकडे एका सखोल दृष्टीकोनातून पाहिलं गेलं पाहिजे अशी भूमिका पांचजन्य मध्ये मांडण्यात आली आहे. मंदिरांच्या मुद्द्याच्या पलिकडे जाऊन राजकारणाकडे पाहा असं मोहन भागवतांनी सुचवलं आहे. समाज म्हणून आपण कुठे मंदिरं दडली आहेत का शोधायचं आणि दुर्लक्षित मंदिरांकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रवृत्तीला काय म्हणणार?

भारताच्या कोपऱ्या-कोपऱ्यांमध्ये ऐतिहासिक वास्तू आहेत

भारताच्या कोपऱ्या-कोपऱ्यात आपल्याला ऐतिहासिक वास्तू, फारशी कुणाला माहीत नसलेली मंदिरं आहेत. अनेक ठिकाणी भग्न शिल्पं आहेत. या सगळ्या गोष्टी आपला वारसा आहेत. ही मंदिरं फक्त पूजा करण्याचं ठिकाण नाही तर आपल्या काळाची स्मृती आहे. भारतावर अनेक आक्रमणं झाली. त्यावेळी मंदिरांवरही हल्ले झाले. आता भग्नावस्थेत असलेली ही मंदिरं तर्काचा आधार देणारी जिवंत संग्रहालयं आहेत, इतिहासाचा आवाज आहेत. नव्या पिढीला त्याबाबत अभिमान असला पाहिजे असंही पांचजन्यमध्ये म्हटलं आहे. प्रत्येक मशिदीत मंदिर शोधण्याची गरज नाही असं मोहन भागवत म्हणाले होते. ज्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र पांचजन्यमध्ये त्यांची भूमिका योग्यच आहे असं म्हणण्यात आलं आहे.

हे पण वाचा- मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य

हिंदू मंदिरांचा उद्धार करण्याचा मुखवटा लावून राजकारण करणं, समुदायांना भडकावणं, स्वतःला सर्वोच्च हिंदू म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करणं हे सगळं सुरु झालं आहे. त्यामुळे मंदिरांचा शोध घेतला जातो आहे. माध्यमांसाठी हा एखादा ट्रेंड किंवा मसाला असल्यासारखं आहे असंही पांचजन्यने म्हटलं आहे. तसंच अशा प्रकारच्या बातम्यांमधून नेमका काय संदेश जातो आहे? याचे काय परिणाम होतील? याचा विचार केला आहे का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

Story img Loader