पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता

केंद्रीय तेल व पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी येत्या काही दिवसात पेट्रोलचे दरात कपात होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय तेल व पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी येत्या काही दिवसात पेट्रोलचे दरात कपात होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. दर कमी झाल्यास महागाईचे चटके सोसणाऱया जनतेला त्यातल्यात्यात दिलासा देणारी ही गोष्ट ठरेल.
डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण थांबल्यामुळे पेट्रोलचे कमी होण्याची शक्यता आहे. मोईली म्हणाले, “आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या दरात होणारा बदल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण थांबल्याचा फायदा नक्कीच पेट्रोल ग्राहकांना होईल. यात काही शंका नाही. त्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी पेट्रोलच्या दर कमी होतील अशी आशा आहे.” 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Moily hints at reduction in petrol price in next few days

ताज्या बातम्या