Mona lisa Painting : विख्यात चित्रकार लिओनार्डो द विंची काढलेलं अजरामर चित्र म्हणजे ‘मोनालिसा’चं चित्र. पॅरीसच्या लूवर या म्युझियममध्ये हे चित्र आहे. या चित्रावर सूप फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रावर बुलेटप्रूफ काच होती त्यामुळे या चित्राला काहीही झालेलं नाही. मात्र दोन महिला कार्यकर्त्यांनी या काचेवर सूप फेकलं, संग्रहालयातील सुरक्षेला चकवा देत त्या या ठिकाणी आल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचं कृत्य

ज्या दोन महिलांनी हे कृत्य केलं त्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत असंही समजतं आहे. उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घडल्या प्रकारानंतर चित्रासमोर काळ्या रंगाचा स्क्रिन लावला होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार दोन महिला कार्यकर्त्या आल्या आणि त्यांनी सरकार तसंच प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की अधिक महत्त्वाचं काय आहे कला की निरोगी आणि योग्य अन्नप्रणाली? कृषी व्यवस्था खराब आहे, शेतकरी काम करताना मरत आहेत. त्यामुळे पर्यावरण तसंच अन्न स्रोतांची गरज अधोरेखित व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असं या पर्यावरणवादी महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ANI ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

लूवर संग्रहालयात दोन महिला येतात. त्या मोनालिसाच्या चित्राजवळ जातात. तसंच त्या मोनालिसाचं चित्र ज्या काचेच्या पलिकडे आहे त्यावर सूप फेकतात हे दिसतं आहे. मात्र मोनालिसाच्या चित्रावर बुलेटप्रूफ काच लावण्यात आली असल्याने या चित्राचे कुठलेही नुकसान झालेले नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मोनिलासाचं चित्र हे लूवर म्युझियममध्ये ठेवण्यात आलं आहे. याआधी एका २०२२ च्या आंदोलनादरम्यान मोनालिसाच्या चित्रासमोरची काच दाबण्यात आली होती. तसंच ऑक्टोबर २०२२ मध्ये लंडन येथील नॅशनल व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या सूर्यफुलाच्या चित्रावर सूप फेकण्यात आले होते. इंधनाच्या वाढत्या किंमती, धोरणांमध्ये झालेले बदल यांचा निषेध करत नुकतीच काही शेतकऱ्यांनी फ्रान्समध्ये निदर्शनं केली होती. त्यानंतर आता मोनालिसाच्या चित्रावर सूप फेकण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संग्रहालयाने पोलिसात तक्रार केली आहे.