मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

1. पुण्यात राजयोग साडी सेंटरला लागलेल्या आगीमध्ये पाच कामगारांचा मृत्यू

पुण्यात देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला लागलेली भीषण आग विझवण्यात आली आहे. या अग्निदुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर..

2. मेहुल चोक्सीची 151 कोटींची संपत्ती जप्त

अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मेहुल चोक्सीभोवती फास आवळला असून त्याची 151.7 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. वाचा सविस्तर..

3.राज्यात बारामतीमध्ये सर्वाधिक दोन लाख ३२ हजार मतांची वाढ

राज्यातील मतदानाच्या टक्केवारीवरून बरेच चर्वित-चर्वण झाले असले तरी प्रत्येक मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी पाहता सर्वच ४८ मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. वाचा सविस्तर..

4.पीक कर्जवाटप लांबणीवर?

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली राज्य सरकारची बँकांसोबतची बैठक निवडणूक आचारसंहितेमुळे मेअखेरीपर्यंत लांबणीवर पडली आहे. वाचा सविस्तर..

5.पंतच्या वादळी खेळीने हैदराबाद गारद, दिल्ली २ गडी राखून विजयी

मागच्या दाराने बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाचा आयपीएलच्या बाराव्या हंगामातला प्रवास अखेर संपुष्टात आलं आहे. वाचा सविस्तर..

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning bulletin pune fire mehul choksi property baramati voters and other news
First published on: 09-05-2019 at 09:54 IST