अमेठी: भाजपा कार्यकर्त्याची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट

उत्तर प्रदेशच्या अमेठी येथे एका भाजपा कार्यकर्त्याची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेंद्र सिंह असं हत्या करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याचं नाव असून ते अमेठीतून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय होते होते अशी माहिती आहे. वाचा सविस्तर

निकालाच्या दिवशी मुस्लीम कुटुंबात पुत्ररत्न, नाव ठेवले नरेंद्र मोदी</strong>

लोकसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवून पुन्ह सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय यात काही शंका नाही. त्यातच आता एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात जन्मलेल्या चिमुकल्याचे नाव नरेंद्र मोदी असं ठेवल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर

नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा केला दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी मला सरकार स्थापन करायला सांगितले असून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे असे मोदींनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सांगितले. वाचा सविस्तर

भाजपच्या प्रभावामुळे ममतांपुढे आव्हान

मोदींचा करिष्मा तसेच तृणमूल काँग्रेसवर अल्पसंख्याकांचा अनुनय केला जात असल्याचा आरोप यामुळे मतदारांचे ध्रुवीकरण तसेच गेल्या वर्षी स्थानिक निवडणुकीनंतर झालेला हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला भोवला. त्यांचे संख्याबळ ३४ वरून २२ पर्यंत खाली आहे. वाचा सविस्तर

‘अभिनय क्षेत्रातील ३५ वर्ष’, अनुपम खेर यांनी शेअर केली भावनिक पोस्ट

अष्टपैलू अभिनेते अनुपम खेर यांना भारतीय सिनेसृष्टीत ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्यांनी इंस्टाग्रामवर काही जुने फोटो शेअर केले असून एक भावनिक पोस्ट सुद्धा लिहिली आहे.या फोटोंमध्ये त्यांच्या पहिल्या सिनेमातील व्यक्तिरेखेचा एक फोटो आहे.महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सारांश’ या चित्रपटातून अनुपम खेर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, मदन जैन, निळू फुले यांच्याही भूमिका होत्या. वाचा सविस्तर