‘मै तो बच्चा हूँ’ – आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला विदर्भात सुरुवात केली.

नागपूर : विधानसभा निवडणूक काही दिवसावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रेला प्रारंभ केल्यानंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य यांनीही जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. यात्रेसाठी मंगळवारी ते विदर्भात आले. मात्र, त्यांनी ‘मी खूप छोटा आहे,’ असे सांगून राजकीय प्रश्नांना बगल दिली. वाचा सविस्तर…

खासदार नवनीत राणा काँग्रेसपासून दुरावल्या?

अमरावती : काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी नवनीत राणा यांना निवडून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानताच सभेत झालेल्या गोंधळानंतर राणा या काँग्रेसपासून किती दूर गेल्या, याची चर्चा आता सुरू झाली आहे. पाच महिन्यांपुर्वी काँग्रेस मेळाव्यात राणांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठेचे वचन घेतले होते. राणा यांनी ते वचन मोडल्याचा आरोप आता होत आहे. वाचा सविस्तर…

पॉर्न पाहणारे माजी मंत्री कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात भ्रमणध्वनीवर पॉर्न पाहणारे तत्कालीन मंत्री लक्ष्मण सवदी यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लावल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार टीका केली आहे. वाचा सविस्तर…

टीकाकारांकडे दुर्लक्ष करतो -रहाणे

गेल्या दोन वर्षांत शतक न साकारता आल्यामुळे टीकाकारांकडून मला सातत्याने लक्ष्य केले जात होते. परंतु या टीकेचा कोणताही परिणाम होणार नाही, याची मी काळजी घेतली, अशी प्रतिक्रिया भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केली. वाचा सविस्तर…

पुणे: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी तरडेंसोबत अभिनेते रमेश परदेशी आणि कार्यकारी निर्माते विशाल चांदणेही होते. सासवडजवळील हिवरे गावात महादेव मंदिरासमोर तरडे यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. वाचा सविस्तर…