अर्थउभारीसाठी करदिलासा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील कंपनी कर आता आशियातील चीन, दक्षिण कोरिया, बांगलादेशच्या समकक्ष आले आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून भांडवली बाजाराकडे पाठ फिरविलेल्या गुंतवणूकदारांचे मन परत वळविण्यासाठी तसेच खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारने शुक्रवारी अर्थव्यवस्थेला उभारी देणारे पाऊल टाकले. ६ वर्षांच्या तळात विसावलेल्या अर्थव्यवस्थेला आणि ४५ वर्षांमधील सर्वाधिक ठरलेल्या बेरोजगारीला सरकारने नव्या उपाययोजनांचा स्पर्श दिल्याने भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाचा सविस्तर…

दक्षिण मुंबईत येत्या बुधवारी पाणी बंद

भंडारवाडा जलकुंभाचा अभ्यास व तपासणी करण्याचे काम पालिकेने हाती घेतल्यामुळे येत्या बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी, व ई विभागातील परिसरांतील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. वाचा सविस्तर…

शिवसेनेचा नरमाईचा सूर ! युतीबाबत दोन दिवसांत निर्णय : उद्धव ठाकरे</strong>

राज्यात स्थिर सरकार आणि राम मंदिरावरील बोलघेवडेपणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुल्लेखाने खडे बोल सुनावल्यानंतर शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मवाळ सुरात आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. वाचा सविस्तर…

२०२१ मधील अपंग क्रिकेटपटूंच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला

नुकताच अपंगांच्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडाप्रेमींसाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा ठरला. २०२१च्या अपंगाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आल्याचे संघ संचालक विनोद देशपांडे यांनी जाहीर केले. वाचा सविस्तर…

Emmy Awards 2019 : सेक्रेड गेम्स आणि लस्ट स्टोरीजला सर्वोत्कृष्ट मालिकेचे नामांकन

 

यंदाच्या इंटरनॅशनल एमी पुरस्कारांवर भारतीय कलाकारांचे वर्चस्व दिसत आहे. नुकतीच या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यांत नेटफ्लिक्सची अत्यंत लोकप्रिय मालिका सेक्रेड गेम्स आणि लस्ट स्टोरीज यांना बेस्ट ड्रामा व बेस्ट मिनी सीरीज या विभागांत नामांकन मिळाले आहे. तसेच अभिनेत्री राधिका आपटे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागात नामांकन मिळाले आहे. वाचा सविस्तर…

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning bulletin top five news avb 95
First published on: 21-09-2019 at 09:34 IST