PM Narendra Modi With New Calf Deepjyoti Video : पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील ७, लोककल्याण मार्गावर असलेल्या घरात एका नव्या सदस्याचे आगमन झाले असून पंतप्रधान निवासस्थानातील एका गाईने वारसाला जन्म दिला आहे. पंतप्रधान मोदींनी या वासराचं नाव दीपज्योती असं ठेवलं आहे. तसेच त्यांनी हे नाव ठेवण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी एक्स या समाज माध्यमावर या वासराबरोबरचा व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.

पंतप्रधान निवासातील गाईने दिला वासराला जन्म

या व्हिडीओत पंतप्रधान मोदी हे वासराबरोबर खेळताना दिसत आहेत. तसेच आपल्या शास्त्रांत “गाव: सर्वसुख प्रदा:” असं म्हटलं गेलं असून दिल्लीतील ७ लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासात एका नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. पंतप्रधान निवासात असलेल्या गाईने एक वासराला जन्म दिला आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा – “पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…

…म्हणून वासराचे नाव दीपज्योती ठेवलं

पंतप्रधान मोदी यांनी या वासराचे दीपज्योती असं नामकरणदेखील केलं आहे. तसेच त्यांनी या मागचं कारणही सांगितलं आहे. या वासराच्या कपाळावर ज्योतीचे निशाण आहे. त्यामुळे मी तिचे नाव दीपज्योती ठेवले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Prithviraj Chavan : “…तर नितीश कुमार-चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील अन् मोदी सरकार कोसळेल”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी मोराला दाणे टाकतानाचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निसर्ग आणि प्राण्यांप्रती असलेलं प्रेम कधीच लपून राहिलेलं नाही. भाषणात किंवा मुलाखतीत त्यांनी याबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी यांनी इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवर मोराचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी आलेल्या मोराची काळजी घेताना दिसून येत होते. ते या मोरांला दाणे टाकत असल्याचं व्हिडीओत दिसत होतं.