फुटीरवाद्यांत अस्वस्थतेचे वातावरण
संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या अफझल गुरू या अतिरेक्याला फाशी दिल्यानंतर काश्मीरमधील फुटीरतावादी गटांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. हुर्रियत कॉन्फरन्सच्या मीरवैझ उमर फारूक याने अफझलच्या फाशीबद्दल ४ दिवसांचा दुखवटा पाळण्यात यावा, असे आवाहन केले आहे. तसेच, या काळात काश्मीरमध्ये संपूर्ण बंद पाळण्यात यावा, असेही मीरवैझने सांगितले आहे.
अफजल गुरूला शनिवारी सकाळी ८ वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात आले आणि तेथेच त्याच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. याबाबत बोलताना उमर फारूकने गुरूच्या मृतदेहाचे अवशेष त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात यावेत आणि कुटुंबाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान हुर्रियतमधील कट्टरतावादी गटाचा म्होरक्या सय्यद अली शाह गिलानी याचा प्रवक्ता अयाझ अकबाद याला पोलिसांनी शनिवारी पहाटे ५ वाजताच प्रतिबंधात्मक अटक केली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mourning appeal of huriyat
First published on: 10-02-2013 at 02:55 IST