संसदेत स्वतंत्र तेलंगणाचे विधेयक सादर करताना ‘पेपर-स्प्रे’ चा मारा करणारे सीमांध्रा भागातील खासदार एल. राजगोपाल यांनी आपण स्वसंरक्षणार्थ ‘पेपर-स्प्रे’ वापरल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर राजगोपाल यांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, माझ्यावर हल्ला करणा-या काँग्रेसच्या खासदारांनाही निलंबित करावे अशी मागणी राजगोपाल यांनी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमारी यांच्याकडे केली आहे. संसदेतील हौद्यात उभे राहून विरोध करणा-या तेलगु देसम पक्षाचे खासदार वेणुगोपाल रेड्डी यांच्यावर काँग्रेसच्या खासदारांनी हल्ला केला. त्यांचा बचाव करण्यासाठी गेले असताना काँग्रेस खासदारांनी आपल्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वरंक्षणार्थ आपल्याला ‘पेपर-स्प्रे’चा वापर करावा लागल्याचे एल. राजगोपाल यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
निलंबित खासदाराकडून स्वसंरक्षणार्थ ‘पेपर-स्प्रे’ वापरल्याचा दावा
संसदेत स्वतंत्र तेलंगणाचे विधेयक सादर करताना 'पेपर-स्प्रे' चा मारा करणारे सीमांध्रा भागातील खासदार एल. राजगोपाल यांनी आपण स्वसंरक्षणार्थ 'पेपर-स्प्रे' वापरल्याचा दावा केला आहे.
First published on: 13-02-2014 at 06:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp claims he used pepper spray in self defence