मध्य प्रदेशमधील कोलारस आणि मुंगावली या दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतमोजणी झाली. या दोन्ही जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून कोलारसमध्ये काँग्रेसने भाजपला ८०८३ मतांनी तर मुंगावलीमध्ये २१२४ मतांनी पराभूत केले.

२४ फेब्रुवारी रोजी दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. मुंगवालीमध्ये ७७.०५ टक्के तर कोलारसमध्ये ७०.४ टक्के मतदान झाले होते. मतदानादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मुंगवाली आणि कोलारस हे दोन्ही मतदारसंघ गुना या लोकसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे करतात.

कोलारस येथे २२ तर मुंगावली येथे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस आमदारांचे निधन झाले होते. कोलारसमध्ये काँग्रेसचे महेंद्र यादव यांची लढत भाजपाच्या देवेंद्र जैन यांच्याबरोबर आहे. तर मुंगावलीमध्ये काँग्रेसकडून बृजेंद्र यादव उभे आहेत. मुंगावली आणि कोलारस या दोन्ही ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत होत आहे.

LIVE UPDATES :