सरकारी पक्षाचे तीन साक्षीदार उलटतपासणीसाठी न्यायालयात हजर राहू न शकल्याने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सात संशयितांविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी तीन आठवडय़ांसाठी तहकूब करावी लागली.
या खटल्याची सुनावणी रावळपिंडीतील अदियाला कारागृहात सुरू असून दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश चौधरी हबीब-उर-रेहमान यांनी सुनावणी ८ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे, असे सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.
एका राजकीय नेत्याच्या हत्येनंतर कराचीत अशांततेचे वातावरण असल्याने रावळपिंडीला येणाऱ्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे हे साक्षीदार रावळपिंडीला पोहोचू शकले नाहीत. गेल्या चार आठवडय़ांपासून या खटल्याची सुनावणीच होऊ शकलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.