माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या हत्या कटात दोषी ठरवण्यात आलेल्या पाकिस्तान हवाई दलाच्या एका तंत्रज्ञाला फासावर लटकावले. सरकारने दहशतवादी प्रकरणातील फाशीच्या शिक्षेवरची बंदी उठवण्यात आल्यानंतर फासावर लटकावण्यात आलेला तो आठवा दहशतवादी आहे. खलिद मेहमूद असे त्याचे नाव असून रावळपिंडीतील अदियाली मध्यवर्ती तुरुंगात त्याला फाशी देण्यात आले.