न्यू यॉर्क : चीनचा विरोध झुगारून अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी मंगळवारी तैवानमध्ये दाखल झाल्या. मंगळवारी रात्री तैपईच्या विमानतळावर पलोसी उतरल्यानंतर चीनने आगपाखड करण्यास सुरुवात केली असून तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली. आधीच युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या संघर्षांमुळे जग पोळले असताना चीन आणि अमेरिकेत वाढता तणाव आशिया खंडासाठी नवी युद्धचिंता घेऊन आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या २५ वर्षांपासून चीनने तैवानवर दावा करीत आहे. त्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यात वाद आहेत. तैवान हा आमच्याच देशाचा भाग असून गरज लागल्यास सक्तीने तो आमच्या देशाशी जोडू, अशी धमकी याआधीही  

चीनने दिली आहे. तैवान प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकचे प्रयत्न असून त्यामुळे चीन आणि अमेरिकेत वादाच्या  ठिणग्या पडत  आहेत. या पार्श्वभूमीवर नॅन्सी पलोसी यांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे.

चीनकडून लष्करी कुमक..

पलोसी यांनी जर तैवानचा दौरा केला तर त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील. बायडेन प्रशासनाने त्यांना परत मायदेशी बोलावून घ्यावे, अशी स्पष्ट मागणी चीनने केली होती. चीनने तैवान सीमेजवळ लष्करी कुमकही तैनात केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nancy pelosi visits taiwan defying china s warnings to us zws
First published on: 03-08-2022 at 03:59 IST