भाजपामध्ये ओबीसी समाजातील नेत्यांवर अन्याय होत असल्याच्या उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी वर्गाला भाजपात आजिबात डावललं जात नसल्याचे भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी म्हटले आहे. तसेच ओबीसी वर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानिक अधिकार मिळवून दिला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, अशा शब्दांत खासदार साबळे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- मोदी-शाह आपल्याच जगात रममान असतात; आर्थिक मंदीवरुन राहुल गांधींची टीका

साबळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण एससी, एसटी नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले होते, हे आश्वासन त्यांनी पाळले आहे. त्यानुसार, बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एससी, एसटी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण १० वर्षांसाठी वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. लोकसभा आणि राज्यसभेत या वर्गांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे या भावनेने संविधानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. २००९ मध्ये वाढवलेल्या या राजकीय आरक्षणाची मुदत जानेवारी महिन्यांत संपत असल्याने मोदी सरकारने ती पुन्हा दहा वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही साबळे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi is obcs babasaheb ambedkar says amar sabele aau
First published on: 05-12-2019 at 16:38 IST