पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार, घारणेशाही संपवायला हवी. त्यासाठी मला जनेतची साथ हवी आहे, असे आवाहन केले. विशेष म्हणजे त्यांनी आगामी २५ वर्षांमध्ये भारत हा विकसित देश म्हणून ओळखला जाण्यासाठी संकल्प करण्याचा आवाहन केले. देशातील नागरिकांना राष्ट्रविकासासाठी त्यांनी ‘पंचप्रण” ही संकल्पना सांगितली.

हेही वाचा >>> राजकारण, संस्थांतील घराणेशाही संपवायला हवी, परिवारवादामुळे भ्रष्टाचार फोफावला- नरेंद्र मोदी

मोदींनी सांगितलेली पंचप्राण संकल्पना काय आहे?

“आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवं. देश यापुढे पंचप्रण आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्रण हे. दुसरा प्रण गुलामीचा अंश बाहेर काढणे हा आहे. गुलामीपासून मुक्ती मिळवायला हवी. आपल्या मनात गुलामीचा थोडाजरी अंश असेल तर तो काढून टाकला पाहिजे. तिसरा प्रण म्हणजे आपल्याला आपल्या वारशाप्रती गर्व असला पाहिजे. कालबाह्य गोष्टींना सोडून नव्या गोष्टी स्वीकारण्याचा आपला वारसा आहे. चौथा प्रण खूप महत्त्वाचा आहे. हा प्रण म्हणजे एकता आणि एकजुटता होय. १३० कोटी जनतेमध्ये एकता हवी. एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नासाठी एकजुटता हा चौथा प्रण आहे. पाचवा प्रण म्हणजे नागरिकांच कर्तव्य हे आहे. यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचादेखील समावेश आहे. आगामी २५ वर्षातील संकल्प पूर्ण करण्यासाठी ही फार महत्त्वाची प्रणशक्ती आहे,” अशे म्हणत मोदी यांनी पंचप्रणची संकल्पना सांगितली.

हेही वाचा>>> Independence Day 2022 : विकसित भारत ते घराणेशाही… स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या समाजात आजही महिलांचा अपमान केला जातो. तो करू नये. महिलांचा सन्मान करायला हवा. मुलगा आणि मुलगी यांना समान वागणून द्यावी, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच देशातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. भ्रष्टाचाऱ्यांप्रती जोपर्यंत चीड निर्माण होणार नाही, तोपर्यत देशातील भ्रष्टाचार संपणार नाही. भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी लोकांनी साथ दिली पाहिजे, असे मोदी म्हणाले. तसेच राजकारण आणि वेगवेगळ्या संस्था यातील घराणेशाहीदेखील संपवली पाहिजे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.