भाजप अध्यक्ष अमित शहा यांची गुरूवारी सुरतमध्ये आयोजित करण्यात आलेली सभा उधळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून नुकत्याच पायउतार झालेल्या आनंदीबेन पटेल यांना तातडीने दिल्लीत हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मोदींच्या या आदेशानंतर आनंदीबेन पटेल खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती भाजपमधील सूत्रांकडून मिळत आहे. आनंदीबेन पटेल यांना महिन्याभरापूर्वीच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आपला उत्तराधिकारी म्हणून नितीन पटेल यांना डावलल्याने आनंदीबेन नाराज झाल्या होत्या. अमित शहा यांनी नितीन पटेल यांना डावलत स्वत:च्या मर्जीतील विजय रुपानी यांना मुख्यमंत्री बनवले होते. मुख्यमंत्री निवडीसाठी झालेल्या नेतेमंडळींच्या बैठकीतही अमितभाई व आनंदीबेन यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. त्यामुळे अमित शहा आणि आनंदीबेन पटेल यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.  या पार्श्वभूमीवर काल सुरतमध्ये अमित शहांची उधळण्यात आल्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
अमित शहा यांना पटेलांचा शह
राजकीय शक्तीप्रदर्शन साधण्यासाठी सुरतमध्ये आलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा गुरुवारी पाटीदार अनामत आंदोलन समितीने उधळली होती. शहरातील पटेल समाजाच्या एका उद्योजकाने स्थापन केलेल्या ‘पाटीदार अभिवादन समिती’ या संस्थेतर्फे अमित शहा यांच्या उपस्थितीत पटेल समाजातील भाजप मंत्र्यांचा सत्कार होणार होता. २०१७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पटेल समाजाला जवळ करण्याकरिता हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. मात्र, सभेला सुरूवात झाल्यानंतर व्यासपीठावर असलेले शहा तसेच मुख्यमंत्री विजय रुपानी व अन्य भाजप नेत्यांना ‘हार्दिक हार्दिक’ या उच्चरवातील घोषणांमुळे तसेच कार्यक्रमस्थळी मोडतोड सुरू झाल्याने काढता पाय घ्यावा लागला. यावेळी आनंदीबेन पटेलही व्यासपीठावर उपस्थित होत्या. या घटनेने गुजरातमधील भाजपला मोठा हादरा बसला असून हार्दिक समर्थकांचा जोर वाढला आहे.
आले शहांच्या मना..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi summons former gujarat cm anandiben patel after flop bjp rally in surat report
First published on: 10-09-2016 at 15:53 IST