संशोधनासाठी किफायतशीर प्रकल्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नासाचा क्यूबसॅट हा नॅनोउपग्रह कार्यान्वित झाला आहे. अ‍ॅटलास पाच या अग्निबाणाच्या मदतीने तो कॅलिफोíनयातील व्हनडेनबर्ग हवाई दल तळावरून तो ऑक्टोबरला सोडण्यात आला होता. हा नॅनो उपग्रह उत्तम काम करीत आहे, असे नासाने म्हटले आहे.

द ऑप्टिकल कम्युनिकेशन अँड सेन्सर डेमनस्ट्रेशन (ओसीएसडी) क्यूबसॅट उपग्रह हा कक्षेत फिरत असून त्याने काम सुरू केल्याचे नासा व द एरोस्पेस कार्पोरेशनचे एल सेगुंडो यांनी कॅलिफोíनयात सांगितले. शैक्षणिक संशोधनाकरिता क्यूबसॅटचा वापर केला जाणार असून अवकाशीय खगोलांचा वेध व इतर तांत्रिक बाबींसाठी एक किफायतशीर यंत्रणा असावी, हा उद्देश त्यामागे आहे. त्यातून पृथ्वी निरीक्षणही साध्य होणार आहे. अवकाश तंत्रज्ञान मोहिमेचे सहायक प्रशासक स्टीव्ह जरझ्ॉक यांनी सांगितले, की ओसीएसडी सारख्या मोहिमा या तंत्रज्ञान प्रगतीत मोठे काम करू शकतात. अवकाशयानांची संदेशवहन क्षमता वाढवून त्यांना माहिती मि़ळवण्यात आणखी सक्षम केले जाऊ शकते व ओसीएसडी हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. क्यूबसॅटमुळे विद्यार्थ्यांना उपग्रह विकास, संचालन व वापर याची प्रत्यक्ष माहिती मिळू शकते व प्रत्यक्ष माहितीच्या आधारे संशोधन करता येते.

नासा तंत्रज्ञान मोहिमेत सहा उपग्रह सोडणार असून ते ओसीएसडी मालिकेतील हा पहिलाच उपग्रह आहे. हे नॅनो उपग्रह प्रत्येक बाजूने चार इंचाचे असतात, त्यांच्या मदतीने तंत्रज्ञानाचा परीक्षण करणे सोपे जाते. ओसीएसडी हे लेसर संदेशवहन पद्धतीपेक्षा वेगळे आहेत कारण लेसर यंत्रणा उपग्रहावर बसवावी लागते व क्यूबसॅट हा लेसर किरणांची दिशा नियंत्रित करतो. त्यामुळे लेसर यंत्रणा अधिक आटोपशीर असते व त्यामुळे आधी अवकाशात सोडलेल्या कुठल्याही उपग्रहांपेक्षा ते सुटसुटीत आहेत.

 

क्यूबसॅट

हे उपग्रह आकाराने लहान म्हणजे सर्व बाजूंनी चार इंचाचे असतात व त्यातून सेकंदाला २० मेगाबाइट इतक्या माहितीची देवाणघेवाण लेसर मार्फत होते. क्यूबसॅट संदेशवहन प्रणालीची क्षमताही जास्त असते. यातील ओसीएसडी मालिकेतील दुसरा नॅनो उपग्रह फेब्रुवारी २०१६ मध्ये कार्यान्वित होणार आहे.

More Stories onनासाNasa
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa cubesats satellite working start
First published on: 14-10-2015 at 03:17 IST