नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या विनंतीनुसार त्यांना चौकशीसाठी जुलैअखेपर्यंत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’ या वृत्तपत्राशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हा चौकशी होणार आहे. जुलैअखेरच्या एखाद्या तारखेस ‘ईडी’समोर आपले म्हणणे मांडण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. संबधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 प्रकृतिअस्वास्थ्यामुळे सोनिया यांनी ‘ईडी’कडे चौकशीसाठी उपस्थित राहण्यास मुदतवाढ मागितली होती. त्यांना २३ जूनला उपस्थित रहायचे होते. त्याला स्थगित देत जुलैअखेर उपस्थित राहण्यास ‘ईडी’ने त्यांना परवानगी दिली. ‘ईडी’ने आधी ८ जूनला चौकशीस उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने २३ जूनला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु करोना व त्यानंतरच्या काही उपचारांनंतर त्यांना सोमवारी (ता.२०) रुग्णलयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्याने, सोनिया यांनी ‘ईडी’कडे मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National herald case ed asks congress sonia gandhi to appear before late july zws
First published on: 24-06-2022 at 04:34 IST