माजी क्रिकेटपटू व माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. एबीपी माझा या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धू अमृतसरमधून निवडणुकीला उभे राहतील. या मतदारसंघातून सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. नवज्योत कौर या निवडणूक लढवणार नाहीत. काही महिन्यांपूर्वीच सिद्धू यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी २८ नोव्हेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने देशातील पाच महत्वाच्या राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार पंजाबमध्ये ४ फेब्रुवारीस मतदान होणार आहे. तर १५ मार्च रोजी मतमोजणी केली जाणार आहे.