Gujarat Riots 2002 : गोध्रा जळीतकांडानंतर (२००२) गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींमध्ये नरोडा पाटिया गावातील मुस्लिमांची घरे पेटवून देण्यात आली होती. या हल्ल्यात ११ लोकांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात भाजपाच्या माजी आमदार माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी, विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल हे प्रमुख आरोपी होते. यांच्यासह इतर ६९ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकास्र सोडलं आहे. गुजरात दंगलीत ज्यांची हत्या झाली, त्यांची हत्या तर झालीच. मात्र, कालच्या निर्णयामुळे देशात संविधानाचीही हत्या झाली, असं विधान शरद पवार यांनी केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.

नरोडा हत्याकांड प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, “देशात दररोज काहीतरी घडतंय. आज एक बातमी आहे की, काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्याकांच्या हत्या झाल्या. हल्ले झाले. यामध्ये काही लोक मृत्यूमुखी पडले. ही जातीय दंगल होती. या जातीय दंगलीमागे गुजरातमधील सत्ताधारी पक्ष होता. यामध्ये अनेकांना अटक झाली. हे प्रकरण अनेक दिवस चाललं.”

हेही वाचा- नरोडा पाटिया हत्याकांड; भाजपाच्या माया कोडनानी, VHPचे जयदीप पटेल, बजरंग दलाचे बाबू बजरंगी यांची निर्दोष मुक्तता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण या प्रकरणात ज्या लोकांना अटक झाली, त्यांना लगेच जामीन देण्यात आला. हा खटला वर्षोनुवर्षे चालला. यानंतर काल उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि सगळ्यांना निर्दोष सोडलं. मग त्यावेळी ज्या लोकांच्या हत्या झाल्या? त्या हत्या कशा झाल्या? जर कुणी हल्लाच केला नसेल, तर हत्या कशा होतील? ज्यांची हत्या झाली त्यांची हत्या तर झालीच. पण एका दृष्टीने या देशात जो कायदा आहे, जी कायद्याची व्यवस्था आहे. त्या कायदा आणि संविधानाचीही हत्या झाली.हे कालच्या निकालावरून स्पष्ट झाली आहे,” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.