भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी “देशातील युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून, युवाशक्ती देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे.” असे म्हटले आहे.
ते गांधीनगर येथील दिनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमात बोलत होते. यानिमित्ताने व्यासपीठावर रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानीही यावेळी उपस्थित होते.
खजिन्यापेक्षा काळा पैसा सरकारने भारतात आणावा!
मोदी म्हणाले, “देशात युवावर्ग मोठ्याप्रमाणावर आहे. त्यांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. गेल्या साठ वर्षांत याकडेच नेमके दुर्लक्ष केले जात आहे. सध्या प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच देशात विजेची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. मला विश्वास आहे की या विद्यापीठातील विद्यार्थी देशातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतील.” तसेच मोदी काँग्रेसवर टीका करण्यासही विसरले नाहीत. सरकारवर शरसंधान करत मोदींनी कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकणावर बोट ठेवून यातून काँग्रेसने देशाचे मोठे नुकसान केले असल्याचे म्हटले. “सरकारने युवकांसाठी काही केले नाही. गैरव्यवहार मात्र न चुकता केले” असेही मोदी म्हणाले.
प्रतीक आणि प्रतिमा 
जनाब मोदींचा ‘आदाब अर्ज’!