NEET PG २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नेशनल एलिजिबिलिटी एंट्रेंस टेस्ट अर्थात NEET पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या NEET PG 2021 परीक्षेला बसलेले उमेदवार आता NBE च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर जाऊन हे निकाल पाहू शकतात.

NEET PG २०२१ समुपदेशन

NEET PG २०२१ निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे. त्यात हजेरी क्रमांक, गुण (८०० पैकी) आणि उमेदवारांनी मिळवलेले रँक यांसारखे तपशील असतील. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेतून जावं लागेल. NEET PG समुपदेशन (NEET PG समुपदेशन 2021) प्रक्रियेचा तपशील लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी केला जाईल.

NEET PG २०२१ कट ऑफ

निकालासह NEET PG क्वालिफायिंग कट ऑफ पर्सेंटाइल देखील जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी सामान्य श्रेणीसाठी कट ऑफ स्कोअर ८०० पैकी ३०२, एससी/एसटी /ओबीसींसाठी ८०० पैकी २६५ आणि UR-PWD साठी २८३ आहे. अधिकृत सूचनेनुसार, अखिल भारतीय ५० टक्के कोटा जागांसाठी रँक आणि पात्रता स्थिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. करोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करून ही परीक्षा घेण्यात आली आहे.

NEET PG २०२१ निकाल कसे पाहाल

स्टेप १ : NBE च्या nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
स्टेप २ : मुख्यपृष्ठावर उपलब्ध ‘NEET PG Result 2021’ या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३ : एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे लॉगिन करावं लागेल.
स्टेप ४ : लॉग-इन क्रेडेंशियल्स एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा.
स्टेप ५ : तुमचा निकाल स्क्रीनवर ओपन होईल.
स्टेप ६ : येथे ctrl+f टाइप करा आणि आपला रोल नंबर शोधून आपला निकाल तपासा.
स्टेप ७ : आपला निकाल डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी एक प्रिंटआउट आपल्याकडे ठेवा.