मंडेलांची प्रकृती चिंताजनकच

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मंडेला यांना रुग्णालयात दाखल करून एक महिन्याहूनही अधिक कालावधी उलटून गेला असून त्यांच्या प्रकृतीस उतार पडावा यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात आहेत.

मंडेला यांना ८ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मडिबांच्या मागे प्रार्थनेचे बळ उभे करणाऱ्या सर्वाबद्दलच कृतज्ञता व्यक्त करताना, ते अजूनही आपल्यात असून येत्या १८ तारखेला त्यांचा ९५ वा वाढदिवस आपण साजरा करू शकू, असा आशावाद झुमा यांनी आळवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nelson mandela remains in critical condition