भारतीय चलनातील २ हजार रूपयांच्या बनावट नोटांप्रकरणी नेपाळ पोलिसांनी ४ पाकिस्तानी आणि २ नेपाळी नागरिकांना अटक केली आहे. काठमांडू येथील त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या सहाजणांकडून नेपाळ पोलिसांनी २ हजार रूपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
Nepal Police arrested 4 Pakistanis and 2 Nepalis in possession of Fake Indian Currency Notes (FICN) at Tribhuvan International Airport in Kathmandu earlier today. pic.twitter.com/fLNTkZyaXJ
— ANI (@ANI) May 24, 2019
या सहा भामट्यांडून जप्त करण्यात आलेल्या नोटा या भारतीय चलनातील २ हजाराच्या बनावट नोटा आहेत अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. आता नोटा नेमक्या या सहाजणांकडे कुठून आल्या? यामागे आणखी काही रॅकेट आहे का? याची चौकशी सध्या नेपाळ पोलीस करत आहेत.