Nepal President : नेपाळच्या पंतप्रधानपदी येथील सीपीएन-माओईस्ट सेंटर पक्षाचे अध्यक्ष पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी अधिकृतपणे ही नियुक्ती केली असून राष्ट्रपती कार्यालयाने तशी माहिती दिली आहे. सोमवारी (२६ डिसेंबर) संध्याकाळी ४ वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेतील. ते तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

हेही वाचा >> ‘वन रँक, वन पेन्शन’ कायद्याच्या सुधारणांवरून राजकारण तापलं, ‘भारत जोडो’ला ‘क्रेडिट लेलो’ यात्रा म्हणत भाजपाचे काँग्रेसवर टीकास्र

राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार येथील संविधानाच्या कलम ७६ मधील उपकलम २ नुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुष्पकमल दहल यांची पंतप्रधानपदाच्या नियुक्तीला सीपीएन-यूएमएल पक्षाचे अध्यक्ष केपी शर्मा ओली, राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने, राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे अध्यक्ष राजेंद्र लिंगडेन या बड्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. या सर्व नेत्यांनी राष्ट्रपतींकडे पुष्पकमल दहल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती.

हेही वाचा >> “त्याने फक्त बिल कमी करा म्हणून सांगितलं, खासगी हॉस्पिटलने थेट निर्वस्त्र करुन…” Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुष्पकमल दहल यांना एकूण २७५ पैकी १६५ लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये सीपीएन-यूएमएलचे ७८, सीपीएन-एमसीचे ३२, आरएसीपीचे २०, आपीपीचे १४, जेएसपीचे १२, जनत पक्षाचे ६ तर नागरिक उन्मुक्ती पार्टीच्या ३ सदस्यांचा पाठिंबा आहे. पुष्पकमल दहल हे तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील.